आम्हाला मान खाली घालायला लावायची कोणाच्या बापाची हिम्मत नाही


जळगाव लाईव्ह न्युज । २६ डिसेंबर २०२२ । भास्कर जाधव साहेब महाराष्ट्र्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यामंत्र्यांना मान खाली घालायला लावायची कोणाच्या बापाची हिम्मत नाही आहे असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत केला.

विधानसभेचा सदर सुरू असताना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधारी पक्षावर आरोप केला. यावेळी ते म्हणाले की तिथे कर्नाटकचे मुख्यमंत्री हवं ते बोलतात. मात्र इकडे आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मान खाली घालून उभे आहेत. हे योग्य नाही. यामुळे आपण लवकरात लवकर ठरव पास केला पाहिजे जेणेकरून सीमा भागी नागरिकांवर अन्याय होणार नाही. त्याचबरोबर सीमा भागामध्ये नागरिकांवर मोठा अन्याय होत आहे. कर्नाटक सरकार मराठी माणसावर अन्याय करत आहे. आपण हव ते करू, येथे आपण एकत्र येऊन मात्र सगळे विषय बाजूला ठेवून ठराव मंडी

यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले की, सीमा प्रश्नावर ठराव येण अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत. मुख्यमंत्री पुन्हा विधिमंडळात येताच आपण हा ठराव पास करू. मात्र भास्कर जाधव साहेब महाराष्ट्र्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यामंत्र्यांना मान खाली घालायला लावायची कोणाच्या बापाची हिम्मत नाही आहे असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.