आमचं नाव झाकण्याचा कोणीही प्रयत्न करू नये : विरोधी पक्षनेते सुनील महाजन

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२२ । आमचं नाव झाकण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. हमारे तकदीर मे जो लिखा होगा वही होगा. सर्वपक्षीय एकत्र येऊन जळगाव शहराचा विकास व्हायला पाहिजे असं सर्वांचं मत आहे. याच अनुषंगाने आम्ही ६२ कोटीच्या प्रस्तावांमध्ये केवळ भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचे प्रस्ताव घेतले. यासाठी मोठं मन लागतं संकुचित विचारसरणी चालत नाही. मात्र समोरून संकुचित विचारसरणी प्रमाणे शहरात लागलेल्या विविध फलकांवर साध महापौरांच आणि उपमहापौरांच नावही नाही. हे चुकीचे आहे. असे विरोधी पक्षनेते सुनील महाजन पत्रकार परिषदेत म्हणाले.

जळगाव शहरात सध्या विकास कामांच्या फलकांवरून मोठे राजकारण सुरू आहे. बांधकाम विभागाने शहरात विविध ठिकाणी विकास कामांचे फलक लावले आहेत. मात्र त्यावर केवळ आमदार राजूमामा भोळे, पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांचे नाव आहेत. महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा साधा कुठे उल्लेख ही नाही. यामुळे या विरोधात शिवसेनेतर्फे महानगरपालिकेच्या सोहळ्या मजल्यावर पत्रकार परिषद घेण्यात आली.

या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, शिवसेना उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक व शिवसेना मनपातील गटनेते बंटी जोशी, नगरसेवक नितीन बर्डे उपस्थित होते.

त्याचबरोबर विकासात आम्ही कधीही राजकारण करत नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्या काळात आम्हाला मदत केली. यात काहीच शंका नाही. असेही विरोधी पक्षनेते सुनील महाजन म्हणाले.

याचबरोबर पत्रकार परिषदेत उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले कि, जळगाव शहराच्या नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिक अक्षरशः शिव्या घालतात. मात्र दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास काम होताना दिसत आहेत. अशावेळी आपले आमदार काय करतात? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. याचबरोबर विकास कामांच्या फलकांवर नियमानुसार महापौर व उपमहापौरांचा नाव अपेक्षित होतं. मात्र ते झालेलं दिसत नाही. अशावेळी याबाबत आम्ही बांधकाम विभागाला पत्र लिहून तक्रार केली असून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे. याचबरोबर नगर विकास मंत्री असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आम्ही शहराच्या विकासासाठी कित्येकदा भेट घेतली आहे. आम्ही स्वतःचा पाठपुरावा केला आहे.

महापौरांचे नाव यायलाच हवं

शहरात लावलेल्या विविध विकास कामांच्या फलकांवर महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व आयुक्तांचे नाव घ्यायला हवं. कारण यांनी केलेल्या प्रयत्नातूनच आज हा निधी जळगाव शहराला मिळला आहे. असे यावेळी नगरसेवक बंटी जोशी म्हणाले.