आदित्य ठाकरेंनी केले विष्णू भंगाळेंचे कौतुक ; वाचा सविस्तर

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२३ । जळगाव जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा विद्यापीठ महाविकास आघाडीचे प्रमुख विष्णू भंगाळे यांनी विद्यापीठाच्या अविसभेवर पाचव्यांदा विजय संपादन केला. त्याचा हा विजय ऐतिहासिक विजय ठरला आहे.यातच त्यांचे कौतुक आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. (aditya thakre in nmu news)

कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट पदवीधर मधून निवडून येणाऱ्या दहा जागांसाठी नुकतेच मतदान झाले. या निवडणुकीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद प्रणित विद्यापीठ विकास मंचाला स्पष्ट बहुमत मिळाले तर दुसरीकडे विद्यापीठ महाविकास आघाडीचा दणाणून पराभव झाला. नऊ जागा या विद्यापीठ विकास मंचाला मिळाल्या तर एक जागा ही विद्यापीठ महाविकास आघाडीला मिळाली (shivsena and bjp in nmu )

असं जरी असलं तरी जिल्हाप्रमुख तथा विद्यापीठ महाविकास आघाडी पॅनलचे प्रमुख यांनी मात्र आपली जागा आबादीत राखत यश मिळवले यांनी लागोपाठ पाचव्यांदा विजय मिळवून अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे यासाठी त्यांचे खुद्द युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले आहे. (vishu bhangale record in nmu)

कौतुक करतांना आदित्य ठाकरे म्हणाले कि, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विष्णूभाऊ भंगाळे यांचे विजयी झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन ! असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

image 3
आदित्य ठाकरेंनी केले विष्णू भंगाळेंचे कौतुक ; वाचा सविस्तर 1