आता मोठ्या पाड्यावर चालणार ‘दादागिरी’ : हि व्यक्ती साकारणार भूमिका

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२३ । एम.एस. धोनी, सचिन तेंडुकलर, कपिल देव यांच्यानंतर आता सौरव गांगुली याच्यावर बायोपिक येणार आहे. चित्रपटाची कथा तयार असून लवकरच शुटिंगला सुरुवात होणार आहे. रणबीर कपूर माजी कर्णधार सौरव गांगुलीची भूमिका साकारणार आहे. गांगुलीच्या बायोपिकच्या स्क्रिपटला मंजुरी मिळाली आहे. लवकरच शूटिंगला सुरुवात होणार आहे.

सौरव गांगुली उर्फ दादा याच्या जिवनावर आधारीत चित्रपट येत आहे. गेल्या काही दिवसांपासून याची जोरदार चर्चा रंगली होती. चित्रपटात दादाची भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे. त्याशिवाय अन्य क्रिकेटपटूंची भूमिका कोण साकारणार? याबाबतची कोणताही माहिती समोर आलेली नाही.

भारताच्या यशस्वी कर्णधारामध्ये सौरव गांगुलीचं नाव घेतलं जात. सौरव गांगुलीच्याच नेतृत्वात टीम इंडिया आक्रमक झाली. गांगुलीनं अनेक युवा खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले. यामध्ये विरेंद्र सहवाग, युवराज सिंह, मोहम्मद कैफ, हरभजन सिंह, इरफान पठान, एम.एस धोनी यासारख्या खेळाडूंना गांगुलीनं संघात स्थान दिलं होतं. गांगुली आपल्या आक्रमक स्वभावामुळे चर्चेत होता. सौरव गांगुली आपल्या खेळामुळे जितका प्रसिद्ध होता,

तितकाच आहे. सौरव गांगुलीन कर्णधार म्हणून अनेक विक्रम नावावर केलेत. विदेशात टीम इंडिया जिंकू शकते, हे गांगुलीच्या विश्वासामुळेच शक्य झालं होत. त्याशिवाय गांगुली फलंदाजी आणि गोलंदाजीतही आपल योगदान देत होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गांगुलीच्या नावावर १८ हजार पेक्षा जास्त धावांची नोंद आहे. त्याशिवाय ३८ शतके आणि १०७ अर्धशतके गांगुलीने झळकावली आहेत. त्याशिवाय १३२ विकेट्सही घेतल्या आहेत. टेस्ट आणि कसोटीत फलंदाजीची सरासरी ४१ पेक्षा जास्त होती.