आघाडीच्या नेत्यांनी माझ्यावर आरोप करण्यापेक्षा परीक्षण करावे – आमदार शिरीष चौधरी

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२३ । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सत्यजीत तांबे यांना माजी खासदार डॉ.उल्हास पाटील व आमदार शिरीष चौधरी यांनी मदत केल्याचा आरोप केला होता. या आरोपाला रविवारी रावेरात आमदार शिरीष चौधरी यांनी उत्तर दिले आहे. (ekanth khade vs sirish chaudari)

ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाचे परीक्षण करावे शिवाय मी सत्यजीत तांबे यांना मदत केली असल्यास ते सिद्ध करून दाखवावे. महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवारासाठीच आपण काम केल्याचे ते म्हणाले. (shirish chudari on eknath khadese )

नाशिक पदवीधर संघ निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी व माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम न करता अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना मदत केली, असा आरोप राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केला होता. यावर आमदार शिरीष चौधरी यांनी आरोपाला रविवारी रावेरात प्रतिउत्तर दिले.

आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवाराचेच आपण कामे केले असून आघाडीच्या नेत्यांनी जे निर्णय घेतले आधी त्याचे परीक्षण करावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.