fbpx

आईपाठोपाठ पाच दिवसांनी चिमुरड्याने घेतला अखेरचा श्वास

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२१ ।  खंडाळा येथील महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याच बरोबर तिच्या ३ व ९ वर्षीय मुलांना देखील विषबाधा झाल्याचे समाेर आले होते. यापैकी मोठा मुलगा श्रेयस याचा नाशिक येथे उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. आईपाठोपाठ पाच दिवसांनी चिमुरड्याने अखेरचा श्वास घातला.

खंडाळा येथील अश्विनी चाैधरी या विवाहितेने घरात काेणीही नसताना बुधवारी (दि.२५) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेच्या काही वेळाने तिची दोन्ही मुले अनुक्रमे प्रणव (वय ३) आणि श्रेयस (वय ९) या दाेघांना विषबाधा झाल्याचे समाेर अाले हाेते. यानंतर त्यांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथे उपचाराअंती प्रणवच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने बुधवारी रात्री सुटी झाली. मात्र, श्रेयसच्या शरीरात जास्त प्रमाणात विष भिनल्याने उपचार सुरू होते. येथे त्याच्या प्रकृतीत दोन दिवसानंतर काहीसी सुधारणा झाली होती. मात्र, त्याची प्रकृती अचानक खालावली. यामुळे सोमवारी त्याला जळगावहून नाशिक येथील खासगी दवाखान्यात हलवण्यात आले. तेथे त्याने शेवटचा श्वास घेतला. यानंतर सोमवारी रात्रीच मृतदेह गावी खंडाळा येथे आणून अंत्यविधी करण्यात आले.
घटनेनंतर नाशिक येथे अकस्मात मृत्यूची नोंद

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज