आकाशवाणी चौकाच्या विस्तारासाठी तयार केला नवीन तांत्रिक आराखडा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । आकाशवाणी चाैकाच्या (जनरल अरूणकुमार वैद्य चौक) विस्तारासाठी चारही बाजूची वाहतूक सुरळीत ठेऊ शकेल अशा सुविधांचा तांत्रिक आराखडा जळगावच्या नागरिकांनी रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे शनिवारी सादर केला. हा आराखडा जळगावचे आर्केटेक्ट शिरीष बर्वे यांनी तयार केला आहे.

महापौर जयश्री सुनील महाजन व माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह आर्किटेक्ट बर्वे, अनिश शहा यांनी हा आराखडा सादर केला. चौकाचा विस्तार सुधारित आराखड्यानुसार केला तर वाहतूक कशी होईल याचे थ्रिडी चित्रणही सादर केले. चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तूर्त वर्तूळाकार बेट तयार करीत आहे. त्याभोवती चारही बाजूची वाहतूक फिरून आपापल्या मार्गाला लागेल. पण या पद्धतीत काही शिस्त गरजेची आहे. अशा शिस्तीत वाहतूक व्हायला काही तांत्रिक बाबींची गरज आहे. त्याचा आराखडा शिरीष बर्वे यांनी सादर केला.

आर्किटेक्ट बर्वेंनी तयार केला सुधारित आराखडा

आराखड्यानुसार मध्यभागी असलेले वर्तूळ कायम असेल. त्यासोबत डाविकडील वळणे यासाठी स्वतंत्र मार्ग असेल. चौकाच्या अगोदर डाव्या वळणासाठी दुभाजक असतील. जी वाहने सरळ जातील त्यांच्यासाठी सरळ रस्ता असेल. जेणेकरून चौकात वाहन कोंडी होणार नाही. याबरोबरच सरळ होणाऱ्या वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल व्यवस्था असेल. डाव्या वळणाच्या जागेवर थांबे नसतील. सध्या चौकालगत असलेले बस व रिक्षांचे थांबे पुढे स्थलांतरित होतील. चौकाचा भाग हॉकर्स प्रतिबंधीत केला जाईल. सुरक्षित वाहतुकीशी संबंधित अशा अनेक बाबींचा आराखड्यात समावेश आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -