अहिर सुवर्णकार सामाज सर्वांसाठी कायमच एक आदर्शवत समाज- आ.किशोर पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२२ । संत नरहरी महाराजांचा निस्सीम भक्त असलेला अहिर सुवर्णकार सामाज हा सर्वांसाठी कायमच एक आदर्शवत समाज असून माझ्या हातून देखील या समाजाची सेवा घडावी यासाठी मी आमदार असे पर्यंत सुवर्णकार समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व सार्वजनिक हिताची विकासकामांसाठी दरवर्षी आपल्या स्थानिक विकास निधीतून २५ लाख रुपयांचा निधी देत राहील अशी घोषणा आमदार किशोर अप्पा पाटील यांनी केली

याचबरोबर पाचोरा नगरपालिकेच्या माध्यमातून देखील सर्व सुविधा पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.सोबतच योग्य जागा उपलब्ध झाल्यास संत नरहरी महाराज यांचे स्मारक देखील उभारण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत पाचोरा येथील अहिर सुवर्णकार मंडळाच्या वतीने मोंढाळा रोडवर असलेल्या संस्थेच्या मालकीच्या २ एकर जागेवर नूतन अत्याधुनिक वास्तूचे भूमिपूजन रविवारी दुपारी १२ वाजता आमदार किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.


यावेळी मंचावर समाजाचे जेष्ठ नेते मुरलीधर अभिमान सराफ,अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष विष्णू बापू सोनार, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल,माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील, युवा नेते सुमित पाटील यांचेसह रवींद्र सराफ,राजू बाळदकर,किरण सोनार, नंदकिशोर जडे शशिकांत सोनार, जगदीश सराफ,राजेंद्र बाविस्कर, दत्तात्रय जडे,संतोष देवरे,राजेंद्र विसपुते यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात आजपर्यंत अध्यक्ष व सचिव पदावर काम केलेल्या सर्वांचा सपत्नीक सत्कार आ.किशोर अप्पा पाटील व सुनीता पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. त्यात माजी अध्यक्ष मुरलीधर शेठ सराफ श्री. व सौ. वासुदेव जडे श्री. व सौ. मनोहर सोनार श्री. व सौ. सुरेश देवरे श्री. व सौ. राजाराम सोनार माजी सचिव श्री. व सौ. नंदकुमार सोनार श्री. व सौ. मनीष बाविस्कर यांचा सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू सोनार यांनी करत सोनार समाजाच्या प्रगतीच्या विषयांमध्ये वेगवेगळ्या राजकीय विचारधारेचे सर्व मंडळी राजकीय जोडे बाहेर ठेवत एकत्र येत असल्याचे सांगून समाजाच्या एकूण प्रगतीचा आढावा मांडला . यावेळी मयूर सराफ यांनी आपल्या परिवारातर्फे आजोबा श्री.नानासाहेब मुरलीधर अभिमान सेठ सराफ यांचे नावाने या नूतन वास्तूसाठी रु.५१ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. तर या निर्माणाधीन वास्तूच्या संरक्षक भिंतीच्या कामासाठी आमदार किशोर अप्पा पाटील यांनी २० लाख रुपयांचा निधी दिला आहे.

यावेळी राजाराम सोनार,शेखर वानखेडे(सावदा) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर शेखर वानखेडे यांनी या कामासाठी ५१ हजार रुपयांचा निधी जाहीर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली जडे, मनीषा जडे यांनी केले. तर आभार राजू बाळदकर यांनी मानले. या कार्यक्रमास सर्व समाजातील मान्यवर स्त्री पुरुषांचा सहभाग होता.कार्यक्रमात बाहेरगावाहून समाजाचे रामदास निकुंभ, अमळनेर मुकुंद विसपुते, अमळनेर रामदास भामरे, जळगाव विजय वानखेडे, जळगाव संजय विसपुते, जळगाव नंदू बागुल, जळगाव संजय पवार, जळगाव सुनील सोनार, भुसावळ धनराज विसपुते, वरखेडी शेखर वानखेडे, सावदा गणेश दापोरेकर, जळगाव हे सहभागी झाले होते..