fbpx

अमळनेरात तिरंगा चौकात १०० फुटी तिरंगा फडकला

mi-advt

 

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१ । अमळनेर शहरात नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी तिरंगा चौकात आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलने १००.३ फूट स्तंभाचे ध्वजारोहण करण्यात आले.

लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, उपनगराध्यक्ष विनोद लंबोळे, विरोधी पक्ष गटनेते प्रवीण पाठक, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड प्रमुख अतिथ होते.

तसेच या वेळी तालुकयातील राजकीय ,सामाजिक ,पत्रकार ,व प्रशासकीय मान्यवर उपस्थित होते. ३० बाय २० फूट आकाराचा ५० किलो वजनाचा ध्वज डौलाने आकाशात फडकवण्यात आला. अनेकांनी या राष्ट्रीय सोहळ्याचा आनंद घेतला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज