अभाविपतर्फे मोफत आरोग्य तपासणी : २५० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२३ । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) व मेडिव्हिजन जळगाव महानगर च्यावतीने जळगाव शहरातील शनीपेठ परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन अभाविप प्रदेश संघटनमंत्री सिधदेश्वर लटपटे, माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविकाभारती कैलास सोनावणे व भाजपाचे नेते कैलास आप्पा सोनवणे याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांना व विद्यार्थ्यांना अभाविप देवगिरी प्रदेश संगठन मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी अभाविपचा कार्याची मांडणी केली व मेडीव्हिजन देवगिरी प्रदेश सहसंयोजक वरून नन्नवरे यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय ची समिती घोषित करण्यात आली.

तसेच आरोग्य शिबिराचे प्रास्ताविक वरुणराज नन्नवरे यांनी केले. यावेळी जळगाव विभाग संगठनमंत्री शुभम स्वामी अभाविप चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगराचे नगराध्यक्ष डॉ. सिद्धार्थ चौधरी, महाविद्यालय अभाविप अध्यक्ष वरुण जोशी आणि मेडिविजन संयोजक प्रसाद कोठावदे उपस्थित होते.

जळगाव शहरातील शनी पेठ परिसरातील २५० हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा आणि मोफत औधोपचाराचा लाभ घेतला. सद्या सुरू असलेल्या सर्दी-खोकल्याच्या साथीने सर्वत्र वातावरण अस्थिर झाले आहे या उपाय म्हणून अभाविप ने या शिबिराचे आयोजन केले होते.

या आरोग्य शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी नारखेडे, डॉ. अक्षय तायडे, आणि दंतचिकित्सक डॉ. सिद्धार्थ चौधरी रुग्णांच्या निदानासाठी उपस्थित होते. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय मेडिव्हिजन समितीचे ३५ विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यकर्त्यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिरात वैद्यकीय तपासणीचे कार्य केले.