अखेर अतिक्रमित वस्तीवर फिरला वन विभागाच्या कारवाईचा बुलडोझर

जळगाव लाईव्ह न्युज|सुभाष धाडे| व्याघ्र अधिवास वडोदा वनक्षेत्रातर्गत डोलारखेडा वनपरीमंडळातील नांदवेल शिवारात शेतजमिनी शेजारील वनहद्दीत अतिक्रमण करुन वसलेल्या पावरी वस्तीवर आज दि ५ रोजी वनविभागाच्या कारवाईचा बुल्डोझर फिरुन सुमारे दहा वर्षापासुन वसलेला अतिक्रमित अधिवास हटविण्यात आले .

हि कारवाई जळगांव येथील उपवनसरंक्षक विवेक होसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सह.उपवनसंरक्षक ऊमेश बिराजदार,वडोदा वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे,वनपाल गणेश गवळी,दिगंबर पाचपांडे,वनपाल मराठे व रेंजमधील सर्व वनरक्षक यांनी केली.

मदतीसाठी जळगांव येथील गस्ती पथकातील वनपाल योगेश दिक्षित,सहकाऱ्यांसह,मुक्ताईनगर वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल कृपाली शिंदे व वनकर्मचारी तसेच जळगांवचे वनकर्मचारी यांची उपस्थिती होती.
सन २०१२-१३ पासुन डोलारखेडा वनपरीमंडळातील मौजे नांदवेल शिवारातील ग्यानसिंग वेलजी पावरा यांनी शेतजमीनी शेजारील वनहद्द कक्ष क्र.५७१ मध्ये ग्यानसिंग पावरा यांच्यासमवेत अन्य जणांनी झोपड्या बांधून अधिवास केला होता. दरम्यान सन २०१७ मध्ये नांदवेलचे तत्कालीन जि.प.सदस्य निलेश पाटील यांनी याबाबत लेखी तक्रार वनविभागाकडे केली व सतत पाठपुरावा केला. वनविभागाकडुन चौकशीसह इतर प्रक्रिया सुरू होती.मागील काही महिन्यांपूर्वी भुमी- अभिलेख व वनविभागाकडुन सयुक्त मोजणी करुन हद्द निश्चित करण्यात आल्या होत्या.

यादरम्यान संबंधित अतिक्रमण धारकांना जागा खाली करुन देणेबाबत नोटीसद्वारे सुचित करण्यात आले होते.मात्र पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता.परंतु उद्या अतिक्रमण काढले जाणार या भीतीने अतिक्रमित पावरी लोकांनी स्वत:हुन आपापल्या झोपड्या खाली केल्या.दोन जेसीबी मशीनच्या साहाय्याने एक पक्के घर व ३४ झोपड्या असलेली एकुण १ हेक्टर ६० आर जागेतील अतिक्रमित मानवी अधिवास वस्ती जमिनदोस्त केली. व चार ट्रॅक्टर व वनमजुरांच्या मदतीने लाकडी मलबा वाहुन नेण्यात आला.वनसीमांलगत खोल चारी खोदण्यात आली.अतिक्रमण काढण्याची कारवाई संद्याकाळपर्यत सुरु होती.

सह उपवनसंरक्षक ऊमेश बिराजदार यांच्यासह कर्मचारी ठाण मांडून होते.शांतताप्रिय वातावरणात कारवाई पार पडली. दरम्यान पट्टेदार वाघांसह वन्यप्राण्यांच्या अधिवासास हस्तक्षेप ठरणारे अतिक्रमणावर कारवाई केल्याने परीसरातुन समाधान व्यक्त होत आहे.