अभाविप विद्यापीठ परिसराची कार्यकारणी जाहीर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद “छात्र नेता” संमेलन कार्यक्रमात कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसराची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.त्यात अध्यक्षपदी हर्षल महाजन,उपाध्यक्षपदी तनुश्री पवार,प्रशांत धनगर,आदित्य कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.शिवाय ७० कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या.

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून अभाविप महारष्ट्र प्रदेश सहमंत्री विराज भामरे उपस्थित होते.कार्यकारणीची निर्वाचन अधिकारी म्हणून अभाविप जळगाव महानगर अध्यक्ष प्रा.डॉ.अमरदीप पाटील यांनी काम पाहिले.यावेळी मंचावर महानगर अध्यक्ष प्रा.डॉ.अमरदीप पाटील,महानगर मंत्री रितेश महाजन,कवयित्री बहिणाबाई नगर मंत्री आकाश पाटील उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमकार कदम यांनी केले.तर आभार प्रदर्शन आकाश पाटील यांनी मानले.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar