अंशतः 20%अनुदानित वरील शालार्थ आयडीचे त्रुटी पूर्तता प्रस्ताव जिल्हा स्तरावरच शिबिरातून मार्गी लावू – आ.सुधीर तांबे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्युज | ६ सप्टेंबर २०२१| अंशतः २०%अनुदानित वरील शालार्थ आयडीचे त्रुटी पूर्तता प्रस्ताव जिल्हा स्तरावरील शिबिरातून मार्गी लावू असे आश्वासन आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी दरम्यान दिले.ते भुसावळ येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ व ताप्ती व्हॅली येथील आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात आले होते.

निवेदनात प्रदीर्घ असा संघर्ष केल्यानंतर राज्यातील उच्च माध्यमिक शिक्षकांना २० टक्के वेतन सुरू झाले व या शिक्षकांचे पुढील नियमित वेतन व्हावे याकरीता शालार्थ आयडी देणे आवश्यक बाब आहे म्हणून शिक्षण संचालक पुणे,मा शिक्षण आयुक्त पुणे, यांच्या वतीने २० टक्के अंशतः अनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांचे शालार्थ आयडी देण्यासंदर्भात राज्यभर संदर्भीय प्रस्ताव तपासून हे प्रस्ताव योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर शालार्थ आयडी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे म्हटले आहे.

 

यावेळी काँग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष शैलेश राणे यांचे विशेष सहकार्य संघटनेला लाभले पाठपुरावा यादरम्यान महाराष्ट्र राज्य उमा कमवि शाळा कृती संघटना जळगाव चे सदस्य व सर्व लाभार्थी शिक्षक सोबत होते. यामध्ये विजय ठोसर, बडगुजर सर,निवृत्ती पाटील,सुधीर शिरसाठ, पराग महाजन, संदीप राजपूत यांचा समावेश होता.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -