⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Fire : कपाशी विकून आलेल्या साडेपाच लाखांची राख, शेतकऱ्याला अश्रू अनावर

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२२ । जामनेर तालुक्यातील कुंभारी सिम येथे घराला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी १६ मे रोजी रात्री घडली. या आगीत संसार उपयोगी वस्तू जाळून खाक झाली. यामळे गरीब शेकऱ्याचे सुमारे १० लाखाचे नुकसान झाले आहे.यावेळी त्या शेकऱ्याला अश्रू अनावर झाले होते.

याबाबत असे की, कुंभारी सिम येथील युवराज पुंडलिक पाटील वय ५६ हे पत्नी, मुलगा व मुलींसह कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांचा मोठ्या मुलेही लग्न झाले आहे. त्यांच्याकडे ८ एकर शेती असून यांच्या घराला रात्री भीषण आग लागली आहे. सुदैवाने घरात कोणीही नसताना ही आग लागली असून मोठा अनर्थ टळला आहे. मात्र या आगीत घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाली आहे. सोबतच घरात असलेली साडेपाच लाखाची रोकड अर्धवट जळाली आहे. तसेच ७ ते ८ क्विंटल कपाशी देखील जळाली आहे.

युवराज पाटील यांच अक्ख कुटुंब स्वतः युवराज पाटील , पत्नी रत्नाबाई पाटील, मुलगा तेजस पाटील, लहान मुलगी कोमल पाटील, मोठी मुलगी योगिता पाटील हे उन्हाळा असल्याने आपल्या घरा बाहेर मोकळ्या आभाळा खाली झोपायला गेले होते. यावेळी सोमवारी रात्री अचानक त्यांचा घराला आग लागली. यावेळी कपाशी विकून आणलेले ५ लाख ५० हजार रुपये व काही कपाशी जाळून खाक झाली. हि आग इतकी भयंकर होती कि, आग लवकर नियंत्रणात आल्याने अख्खे घर पेटले. यावेळी अंगावरचे कपडे सोडल्यास काहीही उरले नाही.

युवराज पाटील यांनी यंदा शेती उत्पनातून मिळालेली कपाशी विकली आणि ते पैसे आपल्या घरात ठेवले होते. लागोपाठ ३ दिवस बँक बंद असल्याने त्यांना ते पैसे बँकेत टाकता आले नाही. मंगळवारी ते हे पैसे बँकेत टाकणार होते. रविवारी घराला आग लागली आणि होत्याचे नव्हते झाले. युवराज पाटील यांच्याकडे जळालेल्या रोकडे व्यतिरिक्त अजून कोणतीही धनराशी बँकेत आणि घरात नाही. अश्या वेळी समाजातून त्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा केली जात आहे.

८ एकर कंपास