⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

विचार जागृती वाचक काट्याचे आयोजन उत्साहात

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी या महामानवांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची  घातले व त्याचाच परिपाक आज आपण सर्वच क्षेत्रात प्रगती करीत आहोत. या समाज सुधारकांनी समानता, अपरिग्रह, संयम, निस्वार्थ वृती, त्याग या तत्वांची जीवनात आवश्यकता आहे हे आपणास सांगितले आहे त्याप्रमाणे आपण जीवन जगले पाहिजे.

भारताचे संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ असून त्यात आपणास जसे अधिकार दिले आहे तसे आपले काही कर्तव्य देखील असतात त्याचे आपण पालन केले पाहिजे. शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी व समाजातील वंचित घटकांसाठी या महनीय व्यक्तींनी अतुलनीय कार्य केले , त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे हे आपले कर्तव्य आहे असे विचार जागृती वाचक कट्ट्यात डॉ. करिश्मा बंब, योगेश शिंपी व प्रा दीपक मराठे यांनी व्यक्त केले.

जागृती वाचक कट्ट्यात  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व भगवान महावीर जयंती निमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुरेश भंडारी, विजय देशपांडे, डॉ. दुर्गेश रुले, सुनील कासार, मोतीलाल कासार, प्रा. डॉ. दिनेश तांदळे, शैलेश चव्हाण, दिपक रोकडे , गणेश पुर्णपात्री , सुशिल महाजन ,इत्यादी उपस्थित होते.