⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

वर्षभरात उपप्रादेशिक परिवहन विभागाची १२ हजार बेशिस्त चालकांवर कारवाई

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांकडून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ९० टक्के जास्त दंड वसुली केली आहे. सन २०२०-२१ मध्ये या पथकाने तडजोड शुल्क व थकीत कराची ४.८१ कोटींची वसुली केली होती. त्या तुलनेत सन २०२१-२२ मध्ये ५.११ कोटी दंड तर २.३४ कोटी थकीत वाहन कर वसुली केली आहे.


वायूवेग पथकाने सन २०२१-२२ मध्ये एकूण ७९९ माल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनधारकांविरुध्द कारवाई करून एकूण ३.६१ कोटी दंड वसूल केला. सन २०२१-२२ या दरम्यान या कार्यालयातील वायुवेग पथकातील अधिकारी यांनी एकूण १२ हजार ४२ दोषी वाहनचालकांविरुध्द मोटार वाहन कायद्यातील विविध कलमाखाली गुन्हे नोंदवले. २०२१-२२ या काळात उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात एकूण ३६ हजार ९३३ दुचाकी तर ५०१६ कार या नवीन वाहनांची नोंदणी झाली.


अवैध प्रवासी वाहतूक १४६१ वाहनधारक, नियमबाह्य खासगी बसधारक १३९, योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेले १६९५ वाहनधारक, हेल्मेट न वापरणारे १७७८ दुचाकीस्वार, माेबाइलवर बोलणारे ३०७ दुचाकीस्वार, सीट बेल्ट न लावणारे २४३ कारचालक, दोषी रिक्षाचालक ७०८, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक ४०१, रिफ्लेक्टर नसणारे १२२७ तर ५२२ अतिजलद वेगाने वाहन चालवणाऱ्या अतिजलद वेगाने वाहन चालवणाऱ्या चालकांविरुद्ध गुन्हा नोंद करुन दंड वसूल केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली आहे.