⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

‘रायसोनी’च्या विद्यार्थ्यांनी बनविल्या ‘टाकाऊपासून टिकाऊ’ वस्तू

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । जळगाव येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागाच्यावतीने ‘त्रिशूल मॅक-फेस्ट २०२१’ या उपक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते. या उपक्रमा अंतर्गत आयोजित ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ या स्पर्धेत हर्षल चंदानी, ललित पाटील, दिपक सैनी, भूषण खंबायत या प्रथम क्रमांक मिळविला.

कच‍ऱ्याचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे निर्माण होणा‍‍ऱ्या समस्या रोखण्यासाठी आपण देखील आपापल्या पद्धतीने हातभार लावू शकतो. आपल्या घरात निर्माण होणा‍‍ऱ्या कच‍ऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘टाकाऊतून टिकाऊ’चा पर्याय अधिक कल्पकपणे अवलंबून आपणही कचरामुक्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकू शकतो. त्यामुळे कच‍ऱ्यात जाणा‍ऱ्या अनेक वस्तूंचा पुनर्वापर होऊ शकेल असा उद्देश समोर ठेवत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागाने ‘त्रिशूल मॅक-फेस्ट २०२१’ या उपक्रमाचे दि.२२ रोजी आयोजन केले होते.

या उपक्रमाअंतर्गत ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ या स्पर्धेत हर्षल चंदानी, ललित पाटील, दिपक सैनी, भूषण खंबायत या स्पर्धकांनी मॅकेनिकल विभागाच्या वर्कशॉपमधील विविध टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ साधने बनवत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. यावेळी क्रीक्रेट, चेस, कॅरम, पोस्टर यासारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. उपक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.वसीम पटेल, प्रा.अविनाश पांचाळ, प्रा.अमोल जोशी, प्रा.जितेंद्र वडद्कर, प्रा.शिवजी कुमार व प्रा. सौरभ गुप्ता यांनी काम पाहिले.