⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

राज्यातील चार मंत्री तुरूंगात जाण्याचा मार्गावर – गिरीश महाजन

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारवर सड कून टीका केली. राज्यात सरकार नावाची गोष्टच शिल्लक नसून, विद्यार्थी,शेतकरी, कष्टकरी, एस.टी.कामगार सर्वांना वाऱ्यावर सोडले आहे. राज्यात आठ-आठ तास वीज पुरवठा खंडीत केला जात आहे.

यामुळे जिल्ह्यातील केळीउत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. मात्र, हे सरकार केवळ खंडणीमध्ये गुंतले असून, दोन मंत्री आधीच तुरूंगात गेले असून, अजून चार मंत्री तुरूंगात जाण्याचा मार्गावर असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला. संपुर्ण राज्य अंधारात असून, ठाकरे सरकार मात्र आपल्याच धुंदीत वावरत असल्याचाही आरोप महाजन यांनी केला.