⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

मेहरूण परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक

जळगाव लाईव्ह न्यूज | २० फेब्रुवारी २०२३ | मेहरूण परिसरामध्ये मेहरूण फाउंडेशन, एक गाव एक गणपती मित्र मंडळ आणि जय जवान चौक सांस्कृतिक व सामाजिक क्रीडा मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. संध्याकाळी मेहरूण परिसरातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी तरुणाईसह नागरिकांनी जल्लोष केला होता.

सकाळी १० वाजता साईबाबा मंदिर परिसरामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये ५० नागरिकांनी रक्तदान केले. त्यानंतर दुपारी रेल्वे स्टेशन, सिंधी कॉलनी, मेहरूण आदि परिसरातील गोरगरीब नागरिकांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दिली होती.

संध्याकाळी मेहरूण परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, प्रभागातील नगरसेवक प्रशांत नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते महाराजांचे पूजन करून त्यांना माल्यार्पण करण्यात आले. यावेळी शिवाजी महाराज यांची वेशभूषा तन्वेष दिनेश लाडवंजारी याने तर राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषामध्ये यशिका रघुनाथ पाटील यांनी लक्ष वेधून घेतले होते.

यानंतर ढोल ताशांच्या गजरामध्ये मेहरूण परिसरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये मेहरूण परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मिरवणूक लोकनेते गोपीनाथराव मुंडे चौकातून निघाली तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणुकीची सांगता झाली.

गौरव घुगे, राहुल सानप, योगेश नाईक, तेजस वाघ, गिरीश लाडवंजारी, हरीश लाडवंजारी, अक्षय सांगळे, गजानन चाटे, योगेश लाडवंजारी, सागर पाटील, अभय चौधरी, महेश घुगे, वैभव वाघ, मंगेश नाईक, अमोल नाईक, भावेश घुगे, संकेत सानप, ऋषिकेश वाघ, चंदू घुगे, विशाल घुगे, भावेश पालवे, रामा सानप, किरण नाईक, रितेश लाडवंजारी, देवेंद्र नाईक, दुर्गेश नाईक, चेतन पाटील, कल्पेश वाघ, शेखर लाडवंजारी, रवींद्र वाघ, गजानन नाईक, विकी सानप, विशाल सानप, कुणाल सानप, आकाश सानप, किरण शेले, वैभव सानप, प्रकाश कराड, सागर घुगे, आकाश घुगे, बिजासन घुगे, भावेश वंजारी, खन्ना घुगे, निलेश सानप,आकाश वाघ, महेश लाडवंजारी, सतीश ढाकणे, अमोल कोळी, यश सपकाळे, अजय सांगळे, गोविंदा सांगळे आदींनी परिश्रम घेतले