⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

महात्मा फुले व डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त बांभोरी येथे शालेय साहित्याचे वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । बांभोरी गावाचे सरपंच सचिन बिऱ्हाडे व भीमज्योत मित्र मंडळ यांच्या वतीने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुरुशिष्य जयंती निमित्त बांभोरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य ( वही , पुस्तक व पेन ) वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे असुन प्रमुख अतिथी म्हणुन धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे , छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत ठाकूर , विर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीप सपकाळे , कास्ट्राईबचे संघटनेचे रमेश सोनवणे , ग्रामपंचायत सदस्य संदीप कोळी मंचावर उपस्थित होते . मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला .
मुकुंद सपकाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते घेईल तो वाघाप्रमाणे गुरगुरेल ” या बाबासाहेबांच्या वाक्याची आठवण करून देत विद्यार्थ्यांनि उत्तम शिक्षण घेऊन उच्च पदावर जाऊन प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन बिऱ्हाडे यांनी तर सुत्रसंचलन सुरेश नन्नवरे यांनी करुन आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर साळवी यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका उषाबाई सुर्यवंशी , शाळेतील शिक्षकवृंद मनीषा पाटील ,वृंदा गरुड व भीमज्योत मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .