⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

मनपाची प्रभाग समिती सभापती निवडणूक २० एप्रिलला हाेणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । महापालिकेत सत्तांतरात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या बंडखाेरांना गेल्या वर्षी संधी देत शिवसेनेने समताेल साधला हाेता. त्यानंतर पुन्हा नगरसेवकांची शिवसेनेतून भाजपत ये-जा सुरू हाेती. दरम्यान पाच बंडखाेरांनी भाजपत घरवापसी केल्याने बंडखाेरांची ताकद काहीअंशी कमी झाली; परंतु याचा प्रभाग समिती सभापती निवडीवर परिणाम हाेण्याची शक्यता कमीच आहे. दरम्यान, २० एप्रिल राेजी हाेणारी सभापती निवडणूक बिनविराेध व्हावी यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ भाजप नेत्यांची भेट घेणार आहे.


महानगरपालिकेत प्रभाग समिती सभापती निवडीच्या निमित्ताने निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली अाहे. ११ एप्रिलपासून चारही प्रभाग समिती सभापती निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. १८ एप्रिल राेजी अर्ज दाखल हाेणार असून, २० राेजी मतदान हाेईल. निवड बिनविराेधसाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ भाजप नेत्यांची भेट घेणार आहे. महापालिकेच्या चारही प्रभाग समिती सभापतींचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात सभापती निवड करण्यात अली हाेती. त्यानंतर पुन्हा सभापती निवडणुकीसाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या अाहेत. ११ ते १३ एप्रिल दरम्यान अर्ज घेता येणार आहेत. निवडणुकीत मतदान टाळण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू झाले अाहेत. भाजपकडेही अपेक्षित संख्याबळ नसल्याने तडजाेडीची शक्यता आहे.


भाजप नेत्यांची भेट घेणार :

प्रभाग समितींमधील शिवसेना व बंडखाेरांची गाेळाबेरीज लक्षात घेता भाजपला विजय मिळवणे अवघड आहे. त्यामुळे सभापती निवडणुकीत मतदान न हाेता बिनविराेध करण्यासाठी शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, सभागृह नेते ललित काेल्हे, विराेधी पक्षनेता सुनील महाजन, गटनेता अनंत जाेशी यांचे शिष्टमंडळ भाजप अामदार सुरेश भाेळे व महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांची भेट घेणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.


असे अाहे पक्षीय बलाबल

{ प्रभाग समिती १ : भाजपचे ७, शिवसेना ५ व बंडखाेर ८.
{ प्रभाग समिती २ : भाजपचे ९, शिवसेना ४ व बंडखाेर ७.
{ प्रभाग समिती ३ : भाजपचे ९, शिवसेना ४, एमअायएम ३ व बंडखाेर ३.
{ प्रभाग समिती ४ : भाजपचे ७, शिवसेना २ व बंडखाेर ७.


बंडखाेरांना पुन्हा संधी शक्य
प्रभाग समिती एक, दाेन व चारमध्ये बंडखाेरांना शिवसेनेकडून संधी दिली जाण्याची शक्यता अाहे. प्रभाग तीनमध्ये एमअायएमला संधी दिली जाऊ शकते. सभापतीपदासाठी खान रूकसानाबी गबलू, मीना ू सपकाळे, देशमुख सुन्नाबी राजू, उषा संताेष पाटील यांना संधी मिळू शकते.