⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

भुसावळातील रामदेवबाबा नगरमध्ये तब्बल ८ ते १० तासांचा अघोषित लोडशेडींग सुरू, नागरिकांमध्ये उद्रेक

जळगाव लाईव्ह न्युज । २२ एप्रिल २०२२ । एकीकडे उन्हाचा तडाखा वाढलेला असून त्यात राज्यावर वीज संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, भुसावळ शहरातील खडका रोडवरील रामदेव बाबा नगरमध्ये अघोषित लोडशेडींग सुरू झाली आहे. तब्बल दहा ते बारा तासांच्या लोडशेडींगमुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले.

या भागात मागील गेल्या अनेक दिवसापासून अनियमित लाईट जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तब्बल चार चार तास लाईट जात आहे. आज मंगळवारी सकाळी सात वाजेला गेलेली लाईट दुपारी बारा वाजेला आली. त्यानंतर लगेच दोन तासानंतर लाईट गेली. ते चार वाजेला आली. पुन्हा सायंकाळी सहा वाजेला गेलेली लाईट अद्यापही रात्री ८ वाजेपर्यंत आलेली नव्हती.
एकीकडे उन्हाळा सुरू आहे. त्यात गर्मी प्रचंड वाढली आहे. आधीच अव्वाच्या सव्वा बिल देणाऱ्या महावितरणकडून आता अनियमित लोडशेडींग सुरू करण्यात आलेली आहे.
राज्यात वाढती विजेची मागणी व कोळसा टंचाईमुळे अनेक ठिकाणी लोडशेडींग सुरू झाली आहे. मात्र महावितरण करून लोडशेडींग लावूनही घोषित केले जात नाहीय. या अघोषित लोडशेडींगमुळे मात्र शेतकऱ्यांसह नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे.