⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

भाजपा संपवणार्‍यांची अवस्था आज महाराष्ट्र अनुभवतोय

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२२ । अनेक नेते आले गेले मात्र भाजपा वाढतच गेली. भाजपा संपवणार्‍यांची अवस्था आज काय आहे ? हे जळगाव जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र पाहतो आहे. भाजपा हा कार्यकर्त्यांच्या व विकासाच्या आधारावर चालणारा पक्ष आहे. भाजपात जाती-पातीचे व पैश्याचे राजकारण चालत नसून भाजपा हा कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा पक्ष आहे, असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू महाजन यांनी येथे केले. वरणगाव शहरातील भाजपा बुथ समितींच्या कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक भाजपा कार्यालयात झाली. याप्रसंगी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
बैठकीला माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, भाजपा शहाराध्यक्ष सुनील माळी, नगरसेविका माला मेढे, रुख्मिणी काळे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा प्रणिता पाटील, आकाश निमकर, हाजी अल्लाउद्दी सेठ, कादिर सेठ, डॉ.सादिक, भाजपा तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अरुण बावणे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, भाजयुमो जिल्हा चिटणीस गजानन वंजारी, ओबीसी शहराध्यक्ष गोलू राणे, नटराज चौधरी, हितेश चौधरी, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, डी.के.खाटीक, सुभाष पोतदार यांची उपस्थिती होती.

यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम

अलीम भाई, सरचिटणीस योगेश माळी, कुंदन माळी, डॉ.नाना चांदणे, पवन माळी, भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेश पालवे, दगडू माळी, सुनील बराटे, भगवान माळी, नाना सोनवणे, अनिल वंजारी, नाना चौधरी, डेपो शंकर पवार, बळीराम दादा सोनवणे, कमलाकर मराठे आदींनी परीश्रम घेतले.