⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

..तर पेट्रोल तब्बल ४० रुपयांनी स्वस्त होणार ; मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

जळगाव लाईव्ह न्युज | २८ जून २०२२ | मागील काही महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहे. यामुळे सर्वसामान्य होरपळून निघत आहे. देशात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी झाल्यापासून पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र मागील पाच वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहेत.

दरम्यान, अशातच येत्या शुक्रवारी वस्तू आणि सेवा परिषदेची (जीएसटी कौन्सिल) बैठक येत्या शुक्रवारी लखनऊमध्ये पार पडणार असून या बैठकीत परिषदेकडून पेट्रोल आणि डिझेलबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. इंधनांचा जीएसटी कर प्रणालीत समावेश झाल्यास पेट्रोल तब्बल ४० रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. यामुळे

सध्या पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकारचा ३२ टक्के आणि राज्य सरकारचा व्हॅट २३.०७ टक्के कर आकारला जातो. प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचा भाव (Petrol Rate) सरासरी ११० रुपये आणि डिझेलचा भाव ८८.६२ रुपये इतका आहे. इंधन जीएसटीच्या कक्षेत आल्यास केंद्र आणि राज्य सरकारची दुहेरी कर पद्धती संपुष्टात येईल. त्याऐवजी एकच जीएसटी कर लागू होईल. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. जीएसटीमध्ये समावेश झाल्यास पेट्रोलचा भाव ७५ रुपये प्रती लीटर आणि डिझेलचा भाव ६८ रुपये प्रती लीटर इतका खाली येण्याची शक्यता आहे.

यापूर्वी जीएसटी परिषदेत पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कार्यकक्षेत आणण्याबाबत प्रस्तावावर चर्चा झाली होती. केरळ उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर १७ सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेने चर्चा केली होती. आता शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.