⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

जळगाव मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा शासनाला विसर

ळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । राज्यात सत्ता असूनही महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला फारसा फायदा हाेत नसल्याचे दिसते. अनेक महिन्यांपासून पालिकेतील पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत . त्यामुळे अन्य अधिकाऱ्यांच्या खांद्यावर ओझे टाकण्यात आले आहे. त्याचा कामावर विपरीत परिणाम हाेत आहे; परंतु शासनाला वारंवार पत्रव्यवहार करूनही अधिकाऱ्यांची नियुक्ती हाेत नसल्याची स्थिती आहे.


महापालिकेत गेल्या सहा महिन्यांपासून मुख्य लेखापरीक्षक हे पद रिक्त आहे. गेल्या दाेन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून शहर अभियंता नसल्याने स्थानिक अभियंत्यांवर जबाबदारी साेपवली जात आहे. सहायक आयुक्तांची बदली झाल्याने त्यांच्याकडे असलेल्या प्रमुख जबाबदाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे साेपवली आहे. सहायक आयुक्तांची नियुक्ती झाल्यास मनपाच्या प्रभाग अधिकारी पदासह अन्य पदांवर शासननियुक्त अधिकारी नियुक्ती करणे शक्य हाेणार आहे. यासंदर्भात महापालिका अायुक्त सतीश कुलकर्णी व महापाैर जयश्री महाजन यांनी वारंवार पत्रव्यवहार केला आहे; परंतु शासनाकडून काेणतीही दखल घेतली जात नाही.