⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

उद्धव ठाकरे यांच्याकडॆ उरले फक्त हे पर्याय : वाचा सविस्तर

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । महाविकास आघाडी सरकारसमोरचं आव्हान मोठं होताना दिसतं असतानाच आता ज्यांना संजय राऊत भीष्म पितामह म्हणतात ते शरद पवार आता शिवसेना वाचवायला निघाले आहेत. कालच त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजापावर हल्लाबोल केला. आता हे सरकार वाचवण्यासाठी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात एक बैठक देखील झाली. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. आता हा आकडा पन्नासच्या वर पोहचला आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे याच्या पुढे काही पर्याय उरले आहेत. ते कोणते ? जाणून घ्या.

  1. एकनाथ शिंदे यांचे मन वाळवणे
    एकनाथ शिंदेंशी चर्चा करुन त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणे हा एक पर्याय आहे. एकनाथ शिंदे यांनी मविआ सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद स्वीकारावे, अशी ऑफऱ देऊ शकतात. असे झाल्यास एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाकडे लक्ष असेल.
  2. कायदेशीर लढाई लढणे
    कायदेशीर लढाई होईल, याचे संकेत गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी दिले आहेत. आता हि लढाई उद्धव ठाकरेंना लढावं लागणार आहे. हे बंड बेकायदेशीर असून, राज्यात आल्यास या मदारांना पोलीस संरक्षण मिळणार नाही, असे वक्तव्य शरद पवारांनी केले आहे. तसेच पुढच्या विधानसभेत या आमदारांना निवडून येणे अवघड असेल, असे सांगत त्यांनी या आमदारांना इशाराच दिल्याचे मानण्यात येतो आहे. पवारांच्या इशाऱ्यानंतर एकनाथ शिंदेंसह १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे.
  3. भाजपला सुरुंग लावणं
    हे बंड जर मोडून काढायचं असेल तर दुसऱ्या मार्गांचा वापरही उद्धव ठाकरेंना करावा लागेल. यात भाजपाच्या आमदारांनाच फोडण्याचे काम शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  4. मध्यावधीला सामोरे जाणं
    मुख्यमंत्र्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय़ घेऊन, मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाण्याचा पर्ययाही आहे. मात्र त्यात राज्यपाल, राष्ट्रपती राजवट अशा काही बाबती अडचणीच्या असू शकतील. मात्र कुठल्याही परिस्थितीत भाजपाचे सरकार येऊ द्यायचे नाही, अशी जर उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. तर कायदेशीर तरतुदी, किचाट्यात हे बंड अडकण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मध्यावधी निवडणुका हाही एक पर्याय असू शकेल.