⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

आरोग्य दिनानिमित्त शिरूड येथेआरोग्य तपासणी शिबीर


जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । जागतिक आरोग्य दिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत शिरूड,ता.अमळनेर आणि आरोग्य वर्धिनी उपकेंद्र शिरूड यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह, उच्च रक्तदाब , क्षयरोग तसेच स्तनांचा, तोंडाचा व गर्भाशयाचा कॅन्सरच्या संशयित रुग्णांची तपासणी करून त्यांना पुढील तपासणीसाठी संदर्भित केले व गाव पातळीवर शक्य ते औषधोपचार करण्यात आले .     


         ग्रामीण जनता बऱ्याचदा अशा आजारांकडे कामाच्या व्यापामुळे दुर्लक्ष करत असते. गावातील शेतकरी आपल्या शेतीच्या कामात व्यस्त असल्यामुळे स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या इतर सदस्यांच्या अशा आजारांकडे दुर्लक्ष करत असतात.पुढे ह्या छोट्या आजारांचे रुपांतर गंभीर आजारात होऊन वेळ व पैसा खर्च होतो आणि त्याचा कुटुंबावर आर्थिक व मानसिक ताण पडतो व आरोग्य खराब होते. अशा गोष्टींचा त्रास त्यांना होऊ नये यासाठी आजाराचे निदान लवकर होणे आवश्यक असते या हेतूने उपकेंद्राचे डॉ अतुल चौधरी , परिचारिका अनिता पाटील , सरपंच गोविंदा सोनवणे व उपसरपंच कल्याणी पाटील यांनी एकत्रित विचार करून हा कार्यक्रम राबविण्याचे योजिले.



       सदर कार्यक्रमाचे उदघाटन डॉ अतुल चौधरी यांनी केले. कार्यक्रमास सरपंच ,उपसरपंच,ग्रामसेविका सोनी पाटील,ग्रा.पं.स. सुरेखा पाटील,चंद्रभागा पाटील,भाऊसाहेब पाटील,कल्पेश माळी, यशवंत बैसाणे.दिपाली पाटील,अलका पाटील उपस्थित होते.

सदर कार्यक्रमास अंगणवाडी सेविका कल्पना पाटील ,पूनम पाटील ,सीमा कुळकर्णी,उपकेंद्र कर्मचारी योगेश गावित,ग्रा.पं.कर्मचारी सतीश पाटील व गावातील कार्यकर्ते सागर पाटील यांचे सहकार्य लाभले.