⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

आंतरराष्ट्रिय महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवा – काँग्रेस

जळगाव लाईव्ह न्युज | २५ जुलै २०२१| मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात होऊ शकतो म्हणून लवकरात लवकर हे खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पाटील यांनी केली आहे. 

मध्य प्रदेशातील रावेर ते झिरण्य खरगोन चित्तोडगढ हा मार्ग रावेर तालुक्यातील मुजलवाडी गावावरून जाणारा आंतरराज्यीय वाहतूकीचा मार्ग आहे. या मुजलवाडी गावाजवळील पुलावर मोठे खड्डे पडले आहेत, रस्त्यातील खड्डे असल्याने तेथे पाण्याचे तळे  साचले आहे  . याठिकाणी गोठलेल्या पाण्यात व गाळातून वाहतुकीसाठी ग्रामस्थांना व वहान धारकाना दररोज त्रास होत आहे. मुजलवाडी नदी पुलावर खड्डे पडल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. जर या खड्ड्यांचे त्वरीत सुधार केले गेले नाहीत तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा मार्ग रावेर पासून मध्य प्रदेशातील झिरन्या खरगोन चित्तोरगडकडे असल्याने मोठे ट्रक ट्राले केळीचे ट्रक लहान मोठे वहा दिवसा रात्रीच्या वेळी वर्दळ असते या खड्ड्यात पाणी साचत राहते , याठिकाणी अनेक मोटारसायकली या खड्ड्यात पडल्या आणि बरेच लोक जखमी झाले. तथापि, सार्वजनिक बांधकाम विभागाने मुजळवाडी नदीच्या पुलावर असलेले खड्डे लवकरात लवकर भरण्यावर भर दिल देण्याची गरज आहे. आणि कोणत्याही प्रकारचे जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळावा. अशी मागणी येथील सरपंच योगेश पाटील व कॉंग्रेसचे रावेर शहराध्यक्ष संतोष पाटील व नागरिकांनी केली आहे.

मुजळवाडी गावच्या नदीवरील असलेल्या पुलावर पावसामुळे वाहनचालकांचा खड्डायात साचलेल्या पाणी घाण किचड मुळे वहान चालकांना गावच्या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे, हे पाहून गावातील सरपंच योगेश पाटील यांनी माझागाव माझी जबाबदारी या संकल्पनेतून त्यानी स्वखर्च्याने यापुलावरील गवत घाण किचडची साफ सफाई केली,पुलीवर असलेले पाण्याचे पाईप साफ करून पाण्याचा मार्ग मोकळा केला. या पुलावरील खड्ड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित मुरूम टाकू दुरुस्ती करावे अशी मागणी केली आणि मागणी केली.

सरपंच योगेश पाटील